विविध भरती प्रक्रियेतील रखलेल्या नियुक्या देण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना निवेदन


मुंबई:

एमपीएससी MPSC सह इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर या शासनाने समस्यांचा डोंगर ऊभा केला आहे. अशावेळी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असा शब्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांनी आज दिला. मुंबई येथे विद्यार्थी शिष्टमंडळासह मी त्यांची भेट घेवून आरक्षण प्रश्न, रखडलेल्या नियुक्त्या अशा विविध बाबींवर चर्चा केली.

मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर याआधी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करा असे न्यायालयीन आदेश असतानासुद्धा  राज्य शासनाने या नियुक्त्या केलेल्या नाहीत. असे जवळपास २१८५ विद्यार्थी हक्काच्या नोकरीपासून वंचित आहेत. परीक्षा पास होवून सुद्धा दोन दोन वर्षापासून हे विद्यार्थी न्यायासाठी झगडत आहेत. मागच्या महिन्यात यातील काही विद्यार्थी मला भेटल्यानंतर मी त्यांची वर्चुअल कॉन्फरन्स घेवून त्यांचे प्रश्न समजावून घेतले होते. आज महाराष्ट्र भरातून आलेल्या या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सुपर न्युमररीचा पर्याय वापरून शासनाने या सर्व विद्यार्थ्यांना सामावून घ्यायला हवे, असे सांगत यासाठी आवश्यक तो सर्व पाठपुरावा करेन असे सांगितले. 

शासकीय नोकरीत येण्याची इच्छा बाळगून, कष्ट करून यश मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या कष्टाला न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

Post a Comment

0 Comments