उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ जिल्ह्यातील एका गावातील नगारिकांनी कोरोना माता मंदिरा बनवलं होत. कोरोना माता मंदिराला पिवळा रंग देण्यात आला होता. मंदिरात ग्रामस्थांना पुजा-पाठ सुरु केले होते. ग्रामस्थांनी वर्गणी काढून मुर्ती तयार केली होती. तसेच या देवीला फक्त पिवळ्या रंगाचीच फुलं अर्पण करण्यात येत होती. मंदिरात नागरिकांची वाढती गर्दीमुळे प्रशासनाने तातडीने खबरदारी घेऊन रातोरात मंदिरावर हातोडा मारला आहे.
या मंदिरावर पोलिसांनी अतिक्रमण करत पाडलं आहे. रात्री ९ च्या सुमारास पोलिसांनी मंदिर पाडले असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच मंदिराची निर्मिती करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. सांगीपुर स्टेशन क्षेत्रातील गावात कोरोनामुळे ३ नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले आहे. त्याच गावात राहणारा तरुण लोकेश श्रीवास्तवने बाकीच्या गावांच्या मदतीने ७ जूनला गावात कोरोना मातेचं मंदिर निर्माण केलं. गाव वाल्यांनी मागणी करुन मुर्ती तयार केली. गावाजवळ असलेल्या कडूनिंबाच्या झाडाखाली या मुर्तीची स्थापना करण्यात आली होती.
गावातील स्थानिक नागरिकांनी विचार आणि बैठक करुन कोरोनावाली माता मंदिर असे नाव दिले. मातेला केवळ पिवळ्या रंगांची फुलं फळंचा नैवैद्य स्थानिक ग्रामस्थ नागरिकांनी सांगितले की, कोरोनामधले हे जगातील पहिलेच कोरोना माता मंदिर आहे. ग्रामस्थांनी असेच कोरोना मातेच्या मंदिराच्या भींतीवरही लिहिले आहे. भींतीवर संदेशही लिहिण्यात आले होते.
0 Comments