बार्शी/प्रतिनिधी:
आरोग्य मंत्री राजेश टोपे, महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदना द्वारे मौजे दडशिंगे ता बार्शी येथे आरोग्य उपकेंद्र मंजुरी बाबत निवेदन दिले.
सदर दडशिंगे हे गाव पानगाव आरोग्य केंद्रा अंतर्गत येतं असून सदर गावात उपकेंद्र झाल्यास दडशिंगे आणि सौन्दरे गावातील नागरिकांना यांचा फायदा होऊन तेथील नागरिकांचे आरोग्य विषयक प्राथमिक समस्या सोडवण्यासाठी मदत होऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी दडशिंगे गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर होणं गरजेचे आहे असं निवेदनात नमूद केलं आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांना योग्य त्या कार्यवाही साठी लवकरच आदेशित करतो असं ना राजेश टोपे साहेबांनी आश्वासीत केलं अशी माहिती दडशिंगे गावचे शिवसेना शाखा प्रमुख माजी उपसरपंच पांडुरंग घोलप यांनी दिली, यावेळी गावचे सरपंच सचिन गोसावी उपस्थिती होते.
0 Comments