नवी दिल्ली : देशात खुल्या आणि निर्भय वातावरणात निवडणुका पार पडाव्यात, तसंच मतदानाची टक्केवारी आणखी वाढावी, यादृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं विधी मंत्रालयाकडे अनेक सुधारणांची शिफारस केली आहे.निवडणुकी दरम्यान उमेदवारांनी खोटी प्रतिज्ञापत्र सादर केली तर त्यांची तुरुंगवासाची शिक्षा दोन वर्षापर्यंत वाढवण्यासारख्या इतर काही सूचनांचा त्यामध्ये समावेश आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी शनिवारी आकाशवाणीला विशेष मुलाखत दिली. या सुधाराणांमधील एक आवश्यक बाब म्हणून पेड न्यूजचा समावेश निवडणूक काळातील गुन्ह्यांच्या यादीत करावा अशी शिफारसही निवडणूक आयोगानं केली आहे.
0 Comments