बार्शी! संत निरंकारी मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन...


संत निरंकारी मंडळ (दिल्ली) शाखा बार्शी यांच्यावतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही कोरोना संदर्भातील सर्व नियम व अटींचे पालन करत, दि.२०/०६/२०२१रोजी सत्संग भवन बार्शी याठिकाणी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोलापूर येथील जिल्हा प्रमुख आदरणीय श्री इंद्रपाल नागपाल महाराज, बार्शी येथील श्रीमान रामभाई शहा रक्तपेढीचे अध्यक्ष श्री अजित कुंकुलोळ, रक्तपेढीचे श्री बुडूख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कोरोना सारख्या महामारीवर मात करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी संत निरंकारी मंडळाच्या वतीने अशाप्रकारच्या शिबिराचे आयोजन संपूर्ण देशभरामध्ये केले जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या शिबिरामध्ये महिलांचाही उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून, या शिबिरामध्ये ७१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. या योगदानाबद्दल सत्संग परिवाराच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी बार्शी सत्संग प्रमुख श्री विठ्ठल बचुटे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेवादल संचालक श्री किशोर ढोले, श्री गणेश उमाप, श्री राजेंद्र चव्हाण, श्री विक्रम क्षिरसागर, श्री विश्वनाथ कापसे, श्री शशिकांत शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments