श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या सुंदर अशा ७२ हजार प्रतिमाची निर्मिती ; गेल्या मंदिर समितीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पादन बुडाले



पंढरपूर/प्रतिनिधी:

गेल्या एक-दड वर्षापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर
लॉक अनलॉक पद्धतीने चालू आहे.  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या आकर्षक अशा प्रतिमा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमातून व्यवसायिकरित्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या प्रतिमा तयार करून त्याची विक्री करण्याचा मंदिर समितीचा उपक्रम आहे. दीड वर्षापासून २७ कोटी रुपयांचे उत्पन्न कमी कमी झाल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली


श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दीड वर्षाचे उत्पन्नात तफावत..
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली आहे. गेल्या दीड वर्षापासून सुमारे २७ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडवले आहे. मंदिर समितीकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी वर्षातील चार महिन्यात मुखदर्शनाची सोय करण्यात आली होत. मात्र त्यानंतर कोरोना च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आठ महिने बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे भाविकांकडून  मिळणाऱ्या देणगी मध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मंदिर समितीच्या उत्पन्नामध्ये मोठी घाट दिसून येते..


कार्यकारी अधिकारी जोशी यांच्या संकल्पनेतून प्रतिमांची निर्मिती..
गेल्या दीड वर्षापासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी
कधी खुले तर कधी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. त्यातच श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या टाळेबंदी चा खर्चही मोठा आहे. ती भरून काढण्यासाठी विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी त्यांच्या संकल्पनेतून श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या प्रतिमा तयार करून तो भाविकांना विक्रीचा पर्याय उपलब्ध करून दिला. गेल्या पंचवीस ते तीस वर्षातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे फोटो काढून त्यांची विक्री केली जात होती. त्यामध्ये त्यांनी बदल करत व्यावसायिक फोटोग्राफर कडून देवतांचे फोटो काढून त्यांची प्रतिमा तयार करण्याचे काम दिले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे ७२ हजार प्रतिमा तयार..
श्री विठ्ठल रुक्मिणी मातीच्या विविध ३१ रूपातील आणि पोशाखातील ७२ हजार प्रतिमा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सहा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमा तयार करण्याचे काम सुरू आहे. या प्रतिमांना वॉटरप्रूफ आणि चांगल्या दर्जाच्या साहित्यांचा वापर करण्यात आला आहे. या प्रतिमेची १०० रुपयांपासून ते २००० रुपये पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. देवाच्या प्रतिमेला वाईट लाईन ही अत्याधुनिक प्रिंटिंग मशीनचा मंदिर समितीकडून खरेदी करण्यात आली आहे. या मशिनद्वारे या ७२ हजार प्रतिमा तयार करण्यात येत आहेत. यासाठी मंदिर समितीतील आठ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. या प्रतिमेसाठी मंदिर समितीकडून लवकरच एका शोरूमचे ही तयारी करण्यात आली आहे. तसेच या प्रतिमा मंदिर समितीच्या वेबसाईटवरही उपलब्ध होणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments