बार्शी/प्रतिनिधी:
शिवराज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधून दडशिंगे ता.बार्शी येथिल शिवसेना शाखा दडशिंगे व शिवरत्न प्रतिष्ठान दडशिंगे तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने गावातील स्मशानभूमी, हनुमान मंदिर, तीर्थक्षेत्र क वर्ग देवस्थान बाळपीर मंदिर परिसरात वृक्षलागवड करण्याचा शुभारंभ उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
गावात जेवढी मतदार तेवढी झाडं एक वर्षात लावणार या संकल्पनेच्या माध्यमातून शिवसेना शाखा व शिवरत्न प्रतिष्ठान दडशिंगे यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधून माझं झाडं माझी जबाबदारी या अभियानाचा चा शुभारंभ केला. तसेच आपण वृक्षलागवड करताना वड, पिंपळ, चिंच, नांदुर्गी आदी झाडांची लागवड करण्याचे आवाहन खासदार साहेबांनी केले.
यावेळी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे प्रदेश सरचिटणीस अँड. विकास जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख प्रविण काकडे, शिवसेना शाखा प्रमुख, माजी उपसरपंच पांडुरंग घोलप, गावचे सरपंच सचिन गोसावी, उपसरपंच मंजुषा प्रकाश पाटील, ग्रामसेविका मेघना पाटील मॅडम, तांदळवाडी सरपंच विकास गरड, सौन्दर्य चे ग्रा.पं. सदस्य शिवशंकर धवन, भिमराव काळे,बालाजी भंडारे, आलम मुलानी, काकासाहेब घोलप, पांडुरंग काळे, छत्रभुज काळे, डिगंबर घोलप, भाऊसाहेब मोरे, आकाश गोसावी, विरेंद्र गोसावी, सुजित घोलप, रियाज मुलानी, रियाज पठाण, श्रीकांत हजारे, परमेश्वर मोरे, धनाजी घोलप, विलास पाटील, सूर्यकांत रांजणकर, ग्रामपंचायत सदस्य बापूराव घोलप, विक्रम घोलप, आर्यन घोलप, साजिद मुलाणी, मनोज घोलप, हनुमंत ताकभाते, ज्ञानेश्वर घोलप, दत्तात्रय सुरवसे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments