सोलापुर! हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा; ८ नृत्यांगनासह २४ जण ताब्यात


सोलापूर/प्रतिनिधी:

 सोलापूरमध्ये हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा टाकून अश्लिल व विभत्स नृत्य करणाऱ्या  ८ नृत्यांगना, व त्यांच्यावर पैसे उधळणाऱ्या २९ इसमांना ताब्यात घेतले. या छाप्यातील कारवाईमध्ये सुमारे ४८लाख,९८ हजार,३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

सध्या कोविड-१९ संसर्गजन्य रोगाचे अनुषंगाने जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा शिवाजी नगर बाळे येथील हॉटेल पॅराडाईजचे मालक बाबा जाफर पठाण हा त्याचे हस्तक संजय पोळ व मॅनेजर मुकेशसिंग बायस यांचेकरवी हॉटेल पॅराडाईज ऑर्केस्ट्राबार चालवित होता.

सदर डान्सबारमध्ये महिला अर्धनग्न अवस्थेत डान्स करुन अश्लिल हावभाव करुन डान्स करीत व काही इसम त्यांचे अंगावर चलनी सदृश्य नोटा उधळून त्यांचे अंगाला स्पर्श करीत आहेत.  पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संजय साळुंखे, पोलीस निरीक्षक  संजय क्षिरसागर, निखिल पवार ,संदीप शिंदे, शैलेश खेडकर ,  फौजदार सुहास आखाड यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल महिला पोलीस कॉन्स्टेबल पोलीस होमगार्ड या पथकाने ही कामगिरी पार पडली.

Post a Comment

0 Comments