पोलिसांच्या कारवाईनंतर दिशा पाटनीनं शेअर केला बिकिनी फोटो, युझर्सनी उडवली खिल्ली


 मुंबई : कोविड-१९ विषयक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८आणि ३४अंतर्गत टायगर श्रॉफ, दिशा पाटनी यांच्यासह त्यांच्या काही मित्रांविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. टायगर श्रॉफ आणि आणि दिशा पाटनी त्यांच्या काही मित्रांसह वांद्र्यातील बॅण्ड स्टॅण्ड परिसरात फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्याचवेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखलं आणि चौकशी केली. परंतु कोणतंही योग्य कारण ते सांगू शकले नाहीत, त्यामुळे मुंबई पोलिसांना त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा लागला.
मुंबईच्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये टायगर श्रॉफ, दिशा पाटनी आणि त्यांच्या काही मित्रांविरोधात कोविड १९ महामारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी कोणालाही अटक केलेली नाही. कारण त्यांच्याविरोधात लावलेली कलमं ही जामीनपात्र आहेत, त्यामुळे त्यांना अटक करणं गरजेचंच आहे असं नाही. पोलीस सध्या पुढील कारवाई करत आहेत.

दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, जिमनंतर दिशा आणि टायगर हे लाँग ड्राईव्हचा आनंद घेण्यासाठी वांद्र परिसरात होते. वांद्रे परिसरातच त्यांची गाडी फिरत होती. टायगर मागच्या सीटवर बसला होता तर दिशा ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसली होती. बँडस्टँड येथे पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांनी चौकशी केली असता बाहेर फिरण्याचे कोणतेही ठोस कारण टायगर व दिशाला देता आले नाही. शेवटी पोलिसांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला.

Post a Comment

0 Comments