बार्शी! वटपौर्णिमा निमित्त युवा प्रतिष्ठानच्या वतीने पाटील प्लॉट येथे वृक्षारोपण



बार्शी/प्रतिनिधी:

वटपौर्णिमा निमित्त येथील शिवछत्रपती क्रीडा व सांकृतिक मंडळ संचलित युवा प्रतिष्ठान हांडे गल्ली मित्र मंडळाच्या सदस्यांनी पाटील प्लॉट येथील ओपन स्पेस येथे वडा चे आठ फूट उंचीचे झाड अजिंक्य फार्म चे संचालक अजिंक्य पवार यांच्या हस्ते लावन्याय आले.

यावेळी पत्रकार शाहजी फुरडे, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड सुशांत चव्हाण, खजिनदार सदानंद गरड, पप्पू चव्हाण, ऋषीकेश गव्हाणे, ज्ञानेश्वर वायकुळे, ऋषिकेश डोंगळे, सुदर्शन हांडे, दयानंद धुमाळ, रोहित डोंगळे, सोनू नवले, भैय्या राऊत आदी उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने आज पर्यंत हांडे गल्ली, बार्शी न्यायालय परिसर, स्व.अर्जुनराव बरबोले व्यापारी संकुल परिसर, पाटील प्लॉट मार्ग आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्याची निगा राखली आहे. 

वटपौर्णिमा हा हिंदू सण आपल्याला निसर्गपूजक असले पाहिजे हा बोध देतो. या मुळेच आजच्या दिवशी शेकडो वर्ष टिकणारे वड हे झाड लावले असून भविष्यात त्याची योग्य ती निगा राखली जाईल तसेच ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल तिथे आजून इतर वृक्ष लागवड केली जाईल असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍड सुशांत चव्हाण यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments