सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवायची असेल "या" नेत्यांच्या त्यागाचा विचार करावा....



मोहोळ/प्रतिनिधी:

१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताना कोण कोण आमदार पक्षात येणार याची चाचपणी सुरू होती. टेबलावर रजिस्टर आणि पेन ठेवले होते आणि ज्याला सोबत यायचे त्याने त्यात नाव लिहायचे होते. त्यावेळी पुढे येऊन टेबलावरील रजिस्टरमध्ये नाव लिहीत साहेब मी तुमच्यासोबत येतोय असं म्हणणारे श्री.राजन पाटील पहिले आमदार होते. तशी अधिकृत नोंदही पक्षाकडे आहे. १९९९ ते आजतागायत सदैव राजन पाटील राष्ट्रवादी आणि पवारांशी संधान बांधून सोबत राहिले अगदी चांगल्या आणि वाईट प्रसंगी.

गेल्या ३ निवडणुकांमध्ये पक्ष म्हणेल त्या उमेदवाराला अत्यल्प काळात चांगल्या मताधिक्याने निवडून दिले. पण याची परतफेड म्हणून पक्षाने राजन मालकांना काय दिले याचा विचार पक्षपातळीवर कधी होईल? दिलेल्या शब्दाशी, विचारांशी आणि निष्ठेशी तडजोड मालकांना करायला जमणार नाही, त्यामुळे अन्यत्र कुठे जाणार नाहीत. म्हणून कायमच त्यांना गृहीत धरले जाणार आहे का.?

जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची विस्कटलेली घडी व्यवस्थित बसवायची असेल तर पक्षातील वरिष्ठ नेत्यांना या गोष्टीचा गांभीर्याने विचार करावा लागेल..

Post a Comment

0 Comments