विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पडण्यासंदर्भात भाष्य केले आहे. सत्तेत पुन्हा येण्यासाठी आम्ही कोणताही प्रयत्न करणार नसून हे सरकार आपल्याच ओझ्याने पडणार आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये कोण कोणावर नाराज आहे, याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नाही, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे. ज्या दिवशी हे सरकार पडेल, त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, असेही फडणवीस म्हणाले.
विधिमंडळाचे अधिवेश ठरवण्याबाबतच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहिले होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी सरकार पडण्यासंदर्भातील विक्तव्य केले आहे.
फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे अनेत तर्कवितर्क लढवले जात आहेत. आम्ही जनतेला जबाबदार आहोत. सत्तेत येण्यासाठी आम्ही काहीही करणार नाही.
देशाच्या ७० ते ७२ वर्षांच्या कालखंडात अशा प्रकारची सरकारे चाललेली आपण पाहिलेले नाही. मात्र, हे सरकार आम्ही पाडणार नाही, तर हे सरकार (government) आपल्याच ओझ्याने पडेल असे ते म्हणाले. जो पर्यंच आम्ही विरोधी पक्षात आहोत, तो पर्यंत आम्ही विरोधी पक्षाची जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहोत, असेही ते म्हणाले.
0 Comments