ग्रामसंसद गुळपोळी ग्रामपंचायत


संसद झाली मुकी 
गरीब घेतोय फासी 
इथला गुडं मवाली सुखी
लोकशाही च खेळणं झालाय 
संसद झाली मुकी 

दिवसा ढवळया खुन दरोडे 
लुटल्या जाती मुली 
सभ्यतेच्या नावाखाली पांघरलेल्या झुली 
गटा गटातून मटा मटातून 
लबाड करतोय एकी 
लोकशाही च खेळणं झालाय 
संसद झाली मुकी 

गुडं मवाली मंत्री झाले 
नेते झालेत डाॅन 
डोकी फुटावी गल्लो गल्ली
मोहल्लयातली  शान 
सत्संगाच्या नावाखाली 
चालू करतोय चुकी 
अन् लोकशाही च्या नावाखाली 
संसद झाली मुकी

शब्द संकलन- सूर्यकांत गोविंद चिकणे गुळपोळी

Post a Comment

0 Comments