बार्शीचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची ग्वाही; राजेंद्र राऊत यांच्या विनंतीला जिल्हाधिकारी यांचा, सकारात्मक प्रतिसाद


बार्शी/प्रतिनिधी:
 
बार्शीतील बाजार पेठा, इतर दुकाने, व्यवसाय सुरू करण्याबाबत ग्रामीण भाग म्हणून स्वतंत्र प्रस्ताव पाठविण्याच्या आमदार राजेंद्र राऊत यांच्या विनंतीला मा.जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, बार्शीचा स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची ग्वाही मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी आमदार राजेंद्र राऊत व व्यापारी शिष्टमंडळाला दिली.

बार्शीतील बाजार पेठ, इतर दुकाने, छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत व बार्शीतील व्यापारी संघटनांचे शिष्टमंडळ आज गुरुवार दि. ३ जून रोजी मा.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना भेटले. या भेटीत इतर दुकाने, व्यवसाय सुरू करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली. यावेळी शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री आमदार विजयकुमार देशमुख, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष शेठ लोढा, संजय खांडवीकर, विनोद बुडूख, अविनाश तोष्णीवाल उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments