आरटीआय कार्यकर्त्याला गोळी घालून ठार मारण्याचा प्रयत्न सभापती अनिल डिसले यांचे विरुध्द गुन्हा दाखल


बार्शी/प्रतिनिधी:

प्रमोद गणपत ढेंगळे हे जवळगाव येथे रहात असून त्यांनी कोल्हापूर आयजी ऑफिसला ई-मेल व्दारे सभापती अनिल बाबुराव डिसले यांच्या विरोधात तक्रार दिलेली होती. याची कुणकुण त्यांना सकाळी लागली आणि त्यानंतर दिनांक २३ जून २०२१ रोजी स्टॅन्डवरुन ढेंगळे हे घराकडे जात असताना त्यांच्या गावातील पंचायत समितीचे सभापती श्री अनिल बाबुराव डिसले यांच्या दारात आले असता, त्यांनी ढेंगळे यांच्या डोक्याला रिव्हॉलर लावले व जोरजोरात घाण घाण अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या आणि तुला आता जिवंतच ठेवीत नाही असे ओरडून बोलू लागले. 

शिव्यादेत मी तालुक्याचा सभापती आहे, एक-दोन मर्डर तर सहज खपवू शकतो, आमदार आमचाच आहे. पोलीस स्टेशन त्यांच्या खिशात आहे. कारण, याअगोदर तुम्ही ज्या तक्रारी दिल्या त्याचे पोलीस स्टेशनने काय केले माझे, हे तुम्हाला माहितच आहे. त्यानंतर ढेंगळे यांनी तेथून पळ काढला मग डिसले हे पाठलाग करीत असताना त्यांनी एक गोळी झाडलेला आवाज आला, परंतु ती गोळी लागली नाही. थोडक्यात ढेंगळे बचावले, त्यांनी सभापती अनिल बाबुराव डिसले व इतर दोन त्यांचे गावगुंड श्री. व्यंकटेश कृष्णात ढेंगळे व सुरेश विश्वनाथ कापसे यांच्यापासून मला संरक्षण मिळावे व त्याच्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशा स्वरूपाची लेखी विनंती व तक्रार पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचेकडे दिली आहे.

तसेच गावातील त्यांचे सहकारी १. व्यंकटेश कृष्णाय ढेंगळे २. सुरेश विश्वनाथ कापसे तसेच सभापती अनिल बाबुराव डिसले यांच्यावर वैराग पोलीस स्टेशनला ब-याच तक्रारी आहेत पण वैराग पोलीस स्टेशनला त्याच्या विरोधातील तक्रारीची दखल घेत नाही, अशी तक्रार दिलेली होती त्यानुसार सोमवारी रात्री उशिरा वैराग पोलीस ठाण्यात अनिल डिसले यांच्याविरुद्ध भादवी कलम व शस्त्र अधिनियम ३ व २५ कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सामाजिक कार्यकर्ते आरटीआय कार्यकर्ते यांच्या वरती होणारे जीवघेणे हल्ले या सर्व बाबींचा विचार करता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments