सिरसाव/प्रतिनिधी:
परंडा तालुक्यातील सिरसाव हे सहा - सात हजार लोकवस्ती गावं. या गावांत सरपंच पदाची धुरा सांभाळत आहेत अवघ्या २४ वर्षाचे कुमार पांडुरंग वायकुळे. अंत्यत खडतर काळात त्यांच्या हाती सरपंच पदांची धुरा आली. कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरला लागली अचूक नियोजन आधारे सरपंच व त्याच्या सहकार्य कोरोना वेशीवर रोखण्याचे काम केले. त्याचे फलित म्हणजे पंचायत समिती कोविड १९ चांगले काम करणाऱ्या गावाच्या यादीत गावाचा समावेश झाला.
शासनाकडून वेळोवेळी आलेल्या सूचनांचे पालन करण्याच्या सूचना गावांतील नागरिकांना दिल्या. ग्रामपंचायत वतीने ग्रामस्थापना कमिटीची गठीत करुन स्वतः अध्यक्ष राहून आर्सेनिक अबलम गोळ्यांचे वाटप, इतर औषधें यांचे काटेकोरपणे नियोजन करुन कोरोना हद्दपार करण्याचे काम ते करत आहेत.
अंत्यत मितभाषी असणारे सरपंच कुमार वायकुळे काम मात्र निश्चित वाखाणण्याजोगे आहे. परंडा तालुक्यातील ७२ गावातून चांगल्या गावाच्या यादीत गाव येणे हि गोष्ट नक्कीच सिरसावकरासाठी आनंददायी आहे. त्याच्या कामात नेहमीच मोलाची साथ देणारे उपसरपंच केदार पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांची मोलांची साथ असते.
0 Comments