माढा! "कुर्डूवाडीजवळ जमीन लेव्हल करताना सापडले मानवी सांगाडे"


महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा अंतर्गत जमीन कसायला दिलेल्या शेतकरी जमीन सुपीक व लेव्हल करत असताना, जमीन नांगरट करतं असलेल्या त्या जमीनीत मानवी सांगाडे सापडले आहेत.

४०-४५ वर्षांपूर्वी या भागात रहाणारे लोक मयत व्यक्तींना शेती महामंडळ श्रीपूर ऊस मळा अंतर्गत पडिक जागेत दफन करत असावेत, असा अंदाज लावण्यात येत आहे. शेती महामंडळातील कामावर असणारे स्थानिक कामगार या परिसरात रहायला होते. त्या काळी गोरगरीब अशिक्षित मजूर मयत व्यक्तींना पुरत असत. त्यातीलच हे सांगाडे असावेत, असे बोलले जात आहे.

माढा तालुक्यातील सापटणे येथील ढवळे पाटील यांनी शेती महामंडळाकडून सुमारे अडीचशे एकर जमीन संयुक्तीक करारांवर पुणे येथील हेड ऑफिसमध्ये पैसे भरुन जमीन कसायला सुरुवात केली आहे. मात्र सदर जमीन नांगरताना हा प्रकार उघडकीस आला आहे. मानवी सांगाडे सापडले याची चर्चा परिसरात झाल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

Post a Comment

0 Comments