सोलापूर/प्रतिनिधी:
ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या नेत्यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. वास्तविक राज्याच्या जडणघडणीत साखर कारखान्यांचे मोठे योगदान राहिले आहे. संकटाच्या काळात मदतीचा हात देण्याची जबाबदारी कारखान्यांनी नेहमीच घेतली आहे. सहकारी उद्योगातील स्किट माऊंटींगचा हा पहिलाचा प्रकल्प पांडुरंग कारखान्याच्या माध्यमातून उभारण्यात आल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे.
स्किड माऊंटेड पध्दतीने हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा राज्याच्या सहकारातील पहिला पथदर्शी प्रकल्प येथील श्री पांडुरंग कारखान्याने उभारला आहे. सुपंत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असे नामकरण करण्यात आले असून, कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले.
अत्याधुनिक भाषा तंत्रज्ञान वापरून स्किड माऊंटेड पध्दतीने हवेतून ऑक्सिजन निर्मिती
राज्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून ऑक्सिजनचा तुटवड आहे त्यामुळे अशा प्रकल्पांची गरज निर्माण झाली होती ऑक्सीजन निर्मिती करण्यासाठी पांडुरंग सहकारी कारखान्यांनी खारीचा वाटा उचलत आहे. सहकारी क्षेत्रात अशा पध्दतीने उभारलेला व संपूर्ण परकीय तंत्रज्ञान असलेला हा पहिलाचा प्रकल्प आहे. प्रकल्पाचे सर्व तंत्रज्ञान तैवान येथून आयात केले आहे. प्रतिदिन २५ एमक्युब एवढी त्याची उत्पादन क्षमता आहे. गेल्या पंधरवड्यातच हा प्रकल्प कार्यान्वित झाला असता मात्र, तौक्ते वादळामुळे अडचण आली. त्यानंतर विमानाने ही मशिनरी आणून केवळ आठ तासात त्याची उभारणी केली आहे. येथून निर्माण झालेल्या आक्सिजनच्या गुणवत्तेची चाचणी झाली असून हा ऑक्सिजन दवाखान्यात वापरण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळाले मिळाल्याची माहिती आमदार परिचारक यांनी दिली.
0 Comments