प्रियकरांने प्रेयसीला वाढदिवसाचे गिफ्ट देतो म्हणून जंगलात नेऊन बलात्कार अन्...



चंद्रपूर :

प्रियकराने प्रेयसीच्या वाढदिवशी तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूरमध्ये घडली आहे. हा आरोपी प्रियकर एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने पीडित मुलीचे बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. 
 
आरोपी सन्मुखसिंग बुंदेल याने प्रेयसीला वाढदिवसाचे गिफ्ट देतो असे सांगत कारवा जंगलात नेले. या ठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने बलात्कार करतानाचे व्हिडीओ आणि फोटो देखील काढले. यानंतर त्या प्रियकराने फेसबुकवर बनावट खाते काढून बलात्काराचे सर्व व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल केले.

आरोपी प्रियकराने सोशल मीडियावर केलेल्या या संतापजनक प्रकरानंतर पीडित मुलीने पोलिसांत जाऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रियकर हा पीडितेला जातीवाचक शब्दात बोलायचा. आरोपीच्या या लज्जास्पद वागणुकीमुळे पीडितेनं आरोपीला लग्नास नकार दिला होता. प्रेयसीने लग्नाला दिलेल्या नकार पचवता न आल्याने आरोपीने, ऐन वाढदिवसी गिफ्ट देण्याचा बहाणा करत जंगलात नेऊन तिच्यावर करत याचा बदला घेतला. हि घटना शुक्रवारी घडली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी आरोपी प्रियकर सन्मुखसिंग बुंदेलला अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments