आमदार प्रकाशरावजी आबिटकर यांच्या माध्यमातून दुबळेवाडी (वाकीघोल)चा रस्ता पूर्ण झाला..


आपल्या कार्य कर्तृत्वाच्या जोरावर आमदार साहेब पुन्हा एकदा तुम्ही आमदार झालात, सामान्य माणसाच्या प्रश्नांना न्याय द्यायचं काम आपल्या माध्यमातून अविरत सुरु आहे आणि सुरु राहील, दुबळेवाडी लोकसंख्या अगदी जेमतेम असणार छोटंस गाव  स्वातंत्र्य मिळून जवळजवळ सत्तर वर्षे लोटली होती, तरीदेखील वाकीघोलच्या अनेक गावचे रस्ते प्रलंबित होते. गेली कित्येक वर्ष या मतदारसंघाच नेतृत्व अनेक माणसांनी केलं,पण आमच्या प्राथमिक, मुलभूत गरजा मात्र आहे तश्याच राहिल्या, तीर्थक्षेत्र वाकोबाच नाव घेऊन निवडणुकी पुरता अनेक नेत्यांनी आमच्या भावनेला फक्त हात घातला, कारण वाकोबा हे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांच कुळदैवत पण याच वाकोबाकडे जाणारे रस्ते मात्र आजपर्यत खडतर होते, वाकीघोल अंधाराच्या काळोखात होता, पण या अंधारातून वाकीघोलला ज्या माणसाने प्रकाशमान केलं, तो माणूस म्हणजे आमदार प्रकाशरावजी आबिटकर.

 याचं वाकिघोल मध्ये राजश्री शाहू महाराज काही वास्तव्या ला होते हे आमचं भाग्य, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हा आमचा भाग आजही दुर्लक्षित होता....??
   
  त्या वास्तवाच्या ठिकाणी जाऊन शाहू महाराजांच्या पदस्पर्शाना वंदन करून ज्या माणसाने आपल्या चळवळीला सुरुवात केली, आणि बघता -  बघता या मतदारसंघाचा कायापालट केला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून संपूर्ण वाकीघोल मधील रस्ते, गावात हॉल बांधणी , पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,  गावातील अंतर्गत रस्ते पहिल्यांदाच निर्माण केले. एक आमदार आपल्या कार्यातून  दुर्लक्षित घटकांना कशा पद्धतीने न्याय देऊ शकतो, याची प्रचिती,याची देही याची डोळा आली साहेब माझ्यासारख्या सामान्य माणसाची तुम्ही दखल घेतली,  तुमच्यासमोर जे-जे प्रश्न मांडले त्याला तुम्ही न्याय दिलात,हे सगळे प्रश्न तुमच्या माध्यमातून पूर्ण झालेत, आमच्या वाकीघोल मध्ये यापूर्वी नेते मंडळी फक्त मत मागायला यायची,पण तुम्हीं या संपूर्ण दुर्लक्षित भागाची दखल घेऊन , संपूर्ण अधिकाऱ्यांची तातडीची मीटिंग घेऊन, झाडाझडती केली, त्यानंतर वाकीघोलमध्ये महत्वपूर्ण विकासकामे झालीत..

 साहेब तुम्ही केलेल्या विकासकामाची नोंद आमच्या   वाकीघोलच्या वाडी वस्तीत राहणाऱ्या प्रत्येक माणसाच्या मनामनात घर करून राहील, हे मात्र नक्की..... 
       
 गावागावात राजकारण करताना मोठेपणा, दिखाऊपणा,स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजिबात करू नका, यामध्ये गावाचं नुकसान आहे, सामाजिक अंगाने विकासासाठी परिपूर्ण असणारी माणसं नजरेपुढे ठेवून त्याचा अभ्यास करून नेता निवडा.

आजची युवा पिढी सुज्ञ आहे, त्याची दिशाभूल करू नका......यामध्येच गावचं कल्याण आहे....

आमदार साहेब संपूर्ण गावच्यावतीने आपलं मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन.

✒️सुनील दळवी.. (वाकीघोलकर )

Post a Comment

0 Comments