मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) ने पोलिस उपनिरिक्षक ( मुख्य )(पीएसआय) पदाच्या भरतीसंदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, इथून पुढे पीएसआय पदाची मुलखात देण्यासाठी शारीरिक चाचणीत ६० गुणं मिळवणं आवश्यक आहे, अशी माहिती आयोगाने परिपत्रक काढत दिली आहे. तसेच या पदासाठीच्या शारीरिक चाचणीत ६० गुण असतील तरच उमेदवाराला मुलाखत देता येणार आहे.
म्हणजेच उमेदवाराला पात्र ठरण्यासाठी फक्त मैदानी गुण गृहीत धरले जाणार आहेत. याआधी शारीरिक चाचणीचे गुण निकालासाठी एकत्रित केले जात होते. मात्र आता अंतिम गुणवत्ता यादीतून शारीरिक चाचणीचे गुण वगळण्यात आले आहेत. हे गुण आता फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
उमेदवाराने पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा दिल्यानंतर त्याला मैदानी परीक्षेत जर ६० गुण मिळाले तर त्याला मुलाखत देता येणार आहे. हे नवे नियम २०२० मध्ये निघालेल्या जाहीराला सुध्दा लागू असणार आहेत.
0 Comments