IPL 2021! आयपीएलमधील उर्वरित सामने यूएईमध्ये होणार, BCCI चा महत्त्वाचा निर्णय


आयपीएलच्या चौदाव्या मोसमावरील अनिश्चिततेचे ढग आता दूर सरले आहेत. कारण आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचं आयोजन आता संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईमध्ये होणार आहे.बीसीसीआयच्या आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठक हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनाच्या संसर्गा मुळे ही स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज (२९ मे) आयपीएल २०२१ बाबत बीसीसीआयने एक बैठक बोलावली. त्यात आयपीएलमधील उर्वरित ३१ सामने खेळवण्यासाठी यूएईची निवड करण्यात आली.

Post a Comment

0 Comments