Dogecoin ची कमाल! 33 वर्षीय तरुणाने कमावले कोट्यवधी



सध्या गुंतवणूकदारांची क्रिप्टो करन्सी मार्केटला विशेष पसंती मिळत आहे. तसेच सध्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूकीला गुंतवणूकदार विशेष प्राधान्य देताना दिसत आहेत. यातच ३३ वर्षीय एक व्यक्ती क्रिप्टो करन्सी Dogecoin मध्ये गुंतवणूक करीत करोडपती बनला आहे. सध्या बाजारात क्रिप्टोकरन्सीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. परंतु, काही क्रिप्टो करन्सीज अशा आहेत की ज्या सातत्याने चर्चेत असतात. यात डॉगकॉईनाचा समावेश असून, हे कॉईन्स गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आले आहेत. टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क यांच्या एका ट्वीटनंतर यात मोठी वाढ दिसून आली आहे.

मित्रांनी केली होती चेष्टा

लॉस एंजलिसमध्ये राहणारे ग्लूबर कॉन्स्टेसोटो (Glauber Contessoto) यांनी फेब्रुवारीत आपली आयुष्यभराची पुंजी Dogecoin मध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे त्यांच्या मित्रांनी चिंता व्यक्त केली. माझ्या मित्रांनी क्रिप्टो करन्सीत पैसे गुंतवू नको असा सल्ला दिला. मी असा निर्णय घेतल्याने त्यांनी मला वेड्यात काढल्याचे ग्लूबर सांगतात. मी अगदी गंमत म्हणून फेब्रुवारीत डिजिटल करन्सीत गुंतवणूक केली. त्यानंतर मी हे सारं विसरुन गेलो.लोकांसाठी Dogecoin हा एक विनोद होता. या करन्सीची सर्वजण चेष्टा करीत होते. परंतु,या विनोदामुळे मला चांगली कमाई करुन दिल्याचे ग्लूबर सांगतात.

ग्लूबर म्हणाले की मी जोखीम घेताना घाबरत नाही. मार्केटमधील (Market) पडझड या गोष्टीकडे मी चांगली संधी म्हणून सातत्याने पाहिले आहे. जेव्हा मार्केट डाऊन असतं तेव्हा जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यावर भर देतो. जेव्हा मार्केट डाऊन असतं तेव्हा स्वस्तात गुंतवणूक करायची आणि निश्चिंत व्हायचं, जेव्हा मार्केटमध्ये तेजी येते तेव्हा आपल्याला नक्कीच फायदा होतो,असे ग्लूबर यांनी सांगितले. मी Dogecoin बद्दल फेब्रुवारीत एक रेडिट थ्रेड वाचला होता. त्यानंतर मी त्यात गुंतवणूक (Investment)करण्याचे ठरवले. मी माझ्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. माझ्याकडील काही पैसे आणि मार्केटमधून घेतलेले उधार पैसे असे मिळून सुमारे 250,000 डॉलरची गुंतवणूक केली. त्यानंतर काही दिवसांनी एलन मस्क यांनी Dogecoin बाबत एक ट्वीट केलं. त्यानंतर त्याच्या मार्केट व्हॅल्यू (Market Value) आश्चर्यकारक वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

बिटकॉईनला झटका पण डॉगकॉईनला फायदा


टेस्लाचे मालक एलन मस्क यांनी जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये (Cryptocurrency)  टेस्लाच्या खरेदीवर युटर्न घेतला. मस्क यांची कंपनी स्पेसएक्स मध्ये (SpaceX) Dogecoin मध्ये पेमेंट घेतले जाईल अशी घोषणा करण्यात आली. टेस्लाने बिटकॉइनच्या माध्यमातून खरेदी बंद करण्याची घोषणा केल्यानंतर Dogecoin च्या दरात चढ-उतार पाहायला (investment) मिळाले. मस्क हे मागील आठवड्यात एका कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर Dogecoin च्या दरात तेजी आली होती. परंतु,त्यानंतर मस्क यांनी एक व्टिट करत मीमसोबत सुरु झालेल्या या क्रिप्टोकरन्सीला एक घाई असं संबोधलं. त्यानंतर त्याच्या दरात मोठी घट झाली. मात्र आता पुन्हा Dogecoin च्या दरात पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळत आहे.

या ट्वीनंतर डॉगकॉईनची किंमत वाढली

मस्क यांच्यावतीने शुक्रवारी एक ट्वीट करण्यात आले, त्यानंतर Dogecoin च्या दरात पुन्हा तेजी येऊ लागली. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की सिस्टीम ट्रान्झॅक्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी Dogecoin च्या डेव्हलपरसोबत काम सुरु आहे आणि त्यात आता चांगली शक्यता दिसत आहे. ट्रेडिंग व्ह्यूच्या वृत्तानुसार,मस्क यांच्या या ट्वीटनंतर Dogecoin च्या दरात १८ टक्क्यांनी तेजी आली आणि त्याचा मार्केट कॅप १० अब्ज डॉलरवर पोहोचला.

Post a Comment

0 Comments