देशातील करोना महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूक महासंचालनाल (डीजीसीए)कडून आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता ३० जूनपर्यंत भारतामधून व भारतासाठी आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवरील बंदी ३० जूनपर्यंत वाढण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर बंदी असली तरी विमानांद्वारे होणारी मालवाहतूनक व कार्गो ऑपरेशन कुरिअर सेवा सुरू राहणार आहे. तर, ३० जूननंतर बंदीला मुदतवाढ द्यायची की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. कोणत्याही देशासोबतच्या मालवाहतूक व कुरिअर सेवेवर बंदी घालण्यात आलेली नाही, सुरक्षा नियम व कोविड नियमांचे पालन करत कामकाज सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
डीजीसीआयने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान वाहतुकीवर ३० जूनपर्यंत बंदी घातलेली असली तरी, वंदे भारत मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय पातळीवर विशेष प्रवासी विमानांची वाहतूक सुरू आहे. याशिवाय एअर बबल करारानुसार प्रवासी विमानांची वाहतूक सुरू आहे.
0 Comments