Corona Fund! विराट व अनुष्का ने सुरू केलेल्या या मोहिमेत तब्बल ११ कोटींचा आकडा केला पार


भारतीय क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ने स्वतःहून मदतीचा हात पुढे केला होता. कोरोना विरुद्ध लढ्यासाठी त्या दोघांनी एक मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत त्यांनी ७ कोटींचे लक्ष ठेवून निधी जमविण्यास सुरूवात केली. मात्र आता या मोहिमेने जवळ जवळ ११ कोटींचा पल्ला पार केला आहे. या मोहिमेत त्या दोघांनीही २ कोटींचे दान केले होते आणि इतरांना शक्य तितके दान करण्याचे आवाहन केले होते. यासाठी विराट आणि अनुष्काने मदतकर्त्यांचे आभार मानले आहेत.

या मोहिमेसाठी एम पी एल स्पोर्ट्स फाऊंडेशन ने ५ कोटींची मदत केल्यानंतर ७ कोटींचे लक्ष पार झाले. यानंतर विराटने ११ कोटींचे लक्ष ठेवले आणि आज ते ही पार झाले. ११ कोटी ३९ लाख ११ हजार ८२० रुपये एव्हाना जमा झाले आहेत.

याबाबत विराटने म्हंटले की, एकदा नव्हे तर दोनदा आम्ही लक्ष पार केले. ही आनंदाची बातमी शेअर करताना मन भरून आले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहेत. ज्यांनी या मोहिमेत हातभार लावला त्या सर्वांचे मनापासून आभार.

Post a Comment

0 Comments