भारत बायोटेकमध्ये खळबळ, व्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीतील ५० कर्मचारी पॉझिटिव्ह


देशात एकीकडे कोरोनाची आकडेवारी वाढत असताना भारत बायोटेकमधून  आलेल्या बातमीने चिंता वाढवली आहे. देशात कोरोना लसीकरणाची  मोहीम जोर घेत असताना भारत बायोटेकमधून अशी माहिती समोर आली आहे की, या फर्ममधील ५० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह (Positive) आढळून आले आहेत. भारत बायोटेकच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला  यांनी ट्वीट केले आहे की त्यांचे ५० कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 

सुचित्रा इला यांच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर (social media) मोठी खळबळ माजली आहे. जी कंपनी कोरोना व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी व्हॅक्सिन बनवते त्याच कंपनीत एवढे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह  (Positive) कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे.भारत बायोटेकमध्ये झालेल्या कोरोनाच्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावर असा सवाल विचारला जातो आहे की, कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना लस का दिली नाही.

 कोवॅक्सिनच्या पुरवठ्यात अडसर आल्यानंतर काही नेत्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना इला यांनी बुधवारी ट्वीट केलं होतं. यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, 'टीमसाठी हे ऐकणं फार वाईट आहे की काही राज्य आमच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. आमचे ५० कर्मचारी कोव्हिड संक्रमणामुळे काम करत नाही आहेत. तरी देखील आम्ही पँडेमिकमध्ये लॉकडाऊनमध्ये २४×७ तुमच्यासाठी काम करत आहोत.'

इला यांनी ट्वीट केल्यानंतर त्यावर लोकांकडून अशा प्रतिक्रिया येत आहेत की या कर्मचाऱ्यांना कोरोना व्हॅक्सिन दिलं नव्हतं का? ते कोरोना पॉझिटिव्ह कसे आढळून आले? शिवाय अस्थायी स्वरुपात काही नवीन कर्मचाऱ्यांना भरती करून का घेतलं नाही? दरम्यान इला यांच्या ट्वीटवर (tweet) काहींनी त्यांचे आभारही मानले आहे. म्हणजे या ट्वीटरनंतर ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.



Post a Comment

0 Comments