सोलापूरची तरुणी स्वतः कमवून ; कोरोना काळात असे दान सर्वांना अभिमान वाटेल!


 सोलापूर/प्रतिनिधी:

देशभरात कोरोनाचं संकट वाढत असल्यामुळे अनेकांना आर्थिक चणचण जाणवत आहे. ती आपला स्वतःचा खर्च कसा भागवते, राहिलेल्या शिल्लक पैशातून ती गोरगरिबांना साठी खर्च करते.

संबंधित तरुणीचं नाव ज्योती यमाजी असं आहे. ज्योती ही शहरातील वियजनगर येथील रहिवासी आहे. ती आईच्या पोटात असतानाच ज्योतीचे वडिल वारले. त्यानंतर आई एका खाजगी पिठाच्या गिरणीत काम करुन घर खर्च आणि ज्योतीच्या शिक्षणाचा खर्च करते. अशातच ज्योती देखील हेल्थ फिटनेस क्लब येथे ट्रेनर म्हणून काम करते. यातून मिळणाऱ्या पैश्यापैकी काही पैसे ती गरीब लोकांना अन्न देण्यासाठी वापरते. मागच्या लाॅकडाऊन पासून ज्योती रस्त्यावरील गरीब लोकांना चहा-बिस्कीट, फुड पॅकेट आणि पाणी बाॅटल वाटते. आपल्या गाडीवरुन निघाल्यानंतर रस्त्याच्या कडेला शोध घेत ती गरीबांना मदत करते. 

ज्योतीला या समाज सेवाची आवड तिच्या आईकडून निर्माण झाल्याचं ती सांगते. आता लाॅकडाऊन असल्यामुळे जिम बंद असून आता ज्योती घरुनच ऑनलाईन पी.टी चे क्लासेस घेतीये. दरम्यान, ज्योती खेळात देखील अग्रेसर असून ती सध्या स्पर्धा परिक्षाची देखील तयारी करत आहे. खेळाची आवड जोपासून, शिक्षण घेत काम करुन मिळेल्या त्या पैश्यांमधून लोकांची सेवा करणं एवढं सगळं ज्योती अगदी व्यवस्थितपणे करतीये.

Post a Comment

0 Comments