करमाळा/प्रतिनिधी:
लॉकडाऊन च्या काळात देखील सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या अवैध व्यवसायांवर कोरोणा कालावधीत सुद्धा कारवाईचा बडगा दिसून येत आहे.
करमाळा तालुक्यातील अवैध दारू व्यवसाय वर कारवाई करून ४८ देशी दारू बाटली १००० लिटर गुळ मिश्रित रसायन तसेच अवैध वाळू माफिया वर मोहोळ येथील दहा ब्रास वाळू असलेला ट्रक व दोन ब्रास वाळू असलेला टेम्पो अंदाजे जप्त केलेल्या नऊ लाख सहा हजार ८८० मुद्देमाल जप्त करत कारवाई केली.
सोलापूर जिल्ह्यातील २५ पोलीस ठाणे यांनी अवैध धंद्यावर कारवाई केले १११ गुन्हे दाखल करून अंदाजे १,५१,३६२ चा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी कोरोना काळात आपापल्या पोलिस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कामगिरी करून अवैध धंद्यावर आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे.
0 Comments