रणजीत पाटील यांचा कोविड योद्धा म्हणून सन्मान

 
परंडा/ प्रतिनिधी :

स्वतंत्र संपादक पत्रकार संघ ऑफ इंडिया यांच्या वतीने श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  रणजीत महादेव पाटील यांना कोविड योद्धा हे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पाटील यांच्या कोरोना काळामध्ये केलेल्या कार्याचा आढावा घेत स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार व उपाध्यक्ष गौरव शेलार यांनी कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित केले आहे.

घर,शेती,पत्रकारिता या बरोबर श्रीमंतराजे प्रतिष्ठाण या संस्थेच्या माध्यमातून रणजीत पाटील यांनी गेल्या वर्ष भरामध्ये कोरोना या जागतिक महामारी काळात अनेक समाजहित उपक्रमाचे घेतले असून त्यांचे हे कार्य आजही सातत्याने सुरू आहे. त्यांच्या या कार्यबाबत व कोविड योद्धा सन्मानपत्र मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments