सोलापूर/प्रतिनिधी:
मागील दीड महिन्यांपासून सुरू असलेला कोरोनाचा कहर सुरूच आहे. शनिवारी शहरात व ग्रामीण भागात २९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्याने १३५५ रुग्णांची भर पडली आहे. २०३६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ३३९ जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात दोन हजार कोरोनामुक्त होऊन घरी
शनिवारी ग्रामीण भागातील ९ हजार ७४८ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८ हजार ३९३ जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर १ हजार ३५५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. २ हजार ३६ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सोलापूर शहराती कोरोना तपासणी करण्यात आली. ४४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सोलापूर जिल्ह्यात पंधरा हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दिवसभरात २९ जणांचा मृत्यू..
सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून दहा दिवसाची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापूर शहर वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये एक जून पर्यंत संचारबंदी असणार आहे. त्यातच आज आलेल्या अहवालानुसार २९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये सोलापूर ग्रामीण भागांमध्ये २४ जणांचा तर शहरी भागात पाच जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे.जिल्हा प्रशासनाकडून सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसून येते.
0 Comments