मोहोळ तालुक्यातील घाटणे गाव कोरोनामुक्त झालं आहे. तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन गाव कोरोनामुक्त केलं. याच्यासह कोमल करपे आणि पोपटराव पवार यांचाही उल्लेख मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला. त्यांची भेट घेऊन माहिती घेणार असल्याचे सांगितले.
पोपटराव पवार यांनी गाव कोरोनामुक्त केलंय. तरुण सरपंच ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे यांनी गाव कोरोनामुक्त केलं. हे दोन तरुण गाव कोरोनामुक्त करू शकतात, तर आपण का नाही करू शकत?”
ते पुढे म्हणाले, “मी या तिघांशीही बोलणार आहे. शक्य झालंय तर तुमच्याशीही संवाद घ़डवून आणेल. राज्यातल्या इतर सरपंचांनीही या सरपंचांनी गाव कसं कोरोनामुक्त केलं ते पाहायला पाहिजे.” देशमुख यांनी ग्रामस्थांना एकत्र करत गावात ‘बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह’ ही मोहीम राबवली. परिणामी गावात कोरोना रुग्णसंख्येत घट होत गेली. सध्या गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे.
0 Comments