सोलापूर शहराच्या हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीत दुसरीकडे दिले जाणार नाही - आ. प्रणिती शिंदे यांचा निश्चय


सोलापूर/प्रतिनिधी:

आज दिनांक ०७ मे २०२१ रोजी नियोजन भवन येथे सोलापूरचे पालकमंत्री श्री. दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत उजनी समांतर जलवाहिनी सोलापूर शहर पाणी पुरवठा योजना अंमलबजावणी व आढावा बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहराकरीता राखीव असलेले सोलापूर शहराच्या हक्काचे पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये दुसरीकडे दिले जाणार नाही असा ठामपणे निश्चय व्यक्त केला. 

तसेच सोलापूर शहराच्या पाणी पुरवठयासाठी करण्यात येणारी दुहेरी पाणी पाईप लाईन तात्काळ पूर्ण करण्यात यावी. तसेच सोलापूर शहराकरीता एक दिवसाआड पाण्याचा पुरवठा करण्यात यावा असेही सांगितले. तसेच सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना सोलापूर शहरात होत आलेल्या विस्कळीत पाणी पुरवठा, पिण्याची पाईप लाईन फुटून वाया जात असलेले पाणी याबाबत उपाययोजना करून सोलापूर शहरास एक दिवसाआड पाणी पुरवठा  करण्यासंदर्भात सुचना दिल्या.

Post a Comment

0 Comments