सोलापूर जिल्ह्यातील सर्व लहान मुलांची तपासणी होणार



सोलापूर/प्रतिनिधी:

कोरोनाबाबतचे दुसऱ्या लाटेतील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. मात्र या लाटेचा लहान मुलांवर प्रभाव असल्याचे दिसून आले. त्यामुळे संभाव्य तिसरा लाटेसाठी आता जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडून उपाययोजनांवर भर दिला जात आहे.  तिसऱ्या लाटे आधीच जिल्ह्यातील अंगणवाडी व प्राथमिक शाळेतील मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. 

जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्वेक्षण केले जाणार
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील झिरो ते पंधरा वर्षे वय गटातील लहान मुलांचे सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये त्या मुलांच्या रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. यावरून त्या बालकांच्या रोग प्रतिकारक क्षमतेचे माहिती मिळू शकणार आहे. त्यामुळे त्यानंतर त्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. 

बाल कोविड सेंटरची निर्मिती होणार

 जिल्ह्यात बालकांचे कोवीड सेंटर सुरू करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी तज्ञांची मदत घेण्यात आली आहे. झिरो ते तीन वर्षे वयोगटातील मुले घरी आईजवळ असतात व तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुले अंगणवाडीत असतात. सध्या कोरोनामुळे अंगणवाड्या बंद असल्या तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे त्यांच्यावर लक्ष आहे. त्यानंतर पहिली ते दहावीपर्यंतची मुले शाळेत असतात. झिरो ते तीन वयोगटातील मुलांना बाधा झाल्यास हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचार करणे जिकरीचे होणार आहे.

Post a Comment

0 Comments