पोलिसांच्या गस्त पथकांवर जमावाने केला हल्ला; ६ जणांवर गुन्हे दाखल



कोरोनाच्या महामारीमुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. संगमनेरमध्ये पोलिसांच्या गस्त पथकावरच आता हल्ला करण्यात आला आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास संगमनेरमध्ये संचारबंदी काळात पोलीस पथक गस्त घालत होतं. मात्र, दिल्ली नाका परिसरात गर्दी जमा झाल्याचं पोलिसांना दिसलं. 

पोलिसांनी त्यांना गर्दी का असं विचारल्यावर जमावाने पोलिसांवरच हल्ला केला आहे. त्यानंतर पोलिसांनी ६ जणांसह अज्ञात जमावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप जमावाने केला आहे.

 या घटनेती माहिती होताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यासह संगमनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मुकुंदराव देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली. आता जमावाला नियंत्रित केलं गेलं आहे. दरम्यान, झालेल्या प्रकारात पोलिसांनी आता सक्ती दाखवत, पथक गस्त घालणाऱ्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. कोरोना काळात काम करणाऱ्या पोलिसांवर हल्ला केल्यानं आता सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Post a Comment

0 Comments