"१२ मे २०२१ रोजी झालेल्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन परीक्षेसाठी ९७४२ पैकी ९२५३ विद्यार्थ्यांनी दिला प्रतिसाद व ११७ परीक्षेचे निकाल घोषित - परीक्षा संचालक गजानन पळसे"

प्रा.डॉ. प्रभाकर माने/शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी :

कोरोना महामारीने रौद्ररूप धारण केले असताना शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने अहोरात्रपणे काम, उत्तम  नियोजन व कार्यकुशल नेतृत्वा द्वारे शिवाजी विद्यापीठाच्या १२ मे २०२१ रोजी M.A.,M.Sc.,B.sc.व B.A. या अभ्यासक्रमाच्या परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्या. या  ऑनलाईन परीक्षेसाठी ९७४२ विद्यार्थ्यापैकी ९२५३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेस प्रतिसाद दिला होता तसेच आजपर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या एकूण ११७ परीक्षेचे निकाल घोषित करून कोरोना काळात परीक्षा विभागाने सर्वोत्तम कार्य केले आहे.
  
 तसेच सदर परीक्षेसाठी येणाऱ्या तांत्रिक अडचणीचे निराकरण विविध माध्यमातून करण्यासाठी विद्यापीठ परीक्षा विभाग तसेच सॉफ्टवेअर पुरवठादार कंपनीची यंत्रणा उत्तम पद्धतीने कार्यरत होती अशा प्रकारची माहिती शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा संचालक गजानन पळसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Post a Comment

0 Comments