उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेना नेतृत्वामध्ये दुफळीचे अस्पष्ट संकेत


बार्शी/प्रतिनिधी:

भुम-परंडा-वाशीचे आ. डॉ. तानाजी सावंत यांनी स्वखर्चाने मतदारसंघा बाहेर बार्शी येथे जम्बो कोरोना रुग्णालयाची उभारणी ८मे २०२१ रोजी होणार आहे. या जम्बो हाॅस्पीटलचे उदघाटन मंत्री एकनाथ शिंदे  आणि मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक मिलींद नार्वेकर करणार आहेत. 

अर्थात समारंभाच्या उदघाटन आणि प्रसार पत्रिकेतुन  उस्मानाबाद जिल्ह्य खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नाव वगळण्यात आले.या दुफळीचे नेमके कारण काहीही असो परंतु स्वपक्षीय खासदारला वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय अथवा वर्चस्ववादी कुरघोडी करण्याचे प्रयत्न डॉ. सावंत करत आहेत यात तिळमात्र साशंकता नाही. आता शिवसेनेच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी नेमका कोणता संदर्भ घ्यावा? जिल्ह्यातील पक्षीय संघटन आणि विस्तारावर काय परिणाम होईल हे काळच ठरवेल.

 या कुरघोडीचा फायदा इतर चाणाक्ष पक्ष घेतील का? अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षच केवळ जिल्ह्यात वर्चस्व राखुन आहेत. कांग्रेस पक्षाचे खेळीमेळीचे नेते केवळ तुळजापूर आणि उमरगा तालुक्याचा उंबरठा ओलांडण्यास तयार नसावेत. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी आणि भाजप हे प्रचलित राजकीय दुफळीचा फायदा घेतील. आपलेच दात आपलेच ओठ म्हणून मुग गिळून बसणारे मात्र परिणामांना सामोरे जातील. 
     
मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघाची सेवा करण्याचे धारिष्ट्य दाखवणारे आ.सावंत सर एकमेवाद्वितीय  असतील अर्थात त्यांनी तो औदार्य भावनेतून केला की संकुचित राजकीय कुरघोडी करण्यासाठी देव जाणे. शिकारीसाठी कोळ्यांने विणलेल्या जाळीचे भक्ष की भक्षक होत हे ज्याच्या त्याच्या सुज्ञतेचा भाग ठरवूत. 

Post a Comment

0 Comments