ऑनलाईन पेमेंटनंतर खात्यातून पैसे कट झाले, पण पेमेंट झालंच नाही तर? हे आहेत उपाय


गतवर्षी कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन  जारी करण्यात आले होते. तेव्हापासून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या देशभरात कोरोनामुळे मागील वर्षी प्रमाणे स्थिती आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जारी केल्यामुळे बॅंकांचे कामकाज मर्यादित वेळेतच सुरु राहत असल्याने नागरिकांकडे ऑनलाईन पेमेंट  हा एकमेव पर्याय आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केल्यानंतर विशेषतः य़ूपीआय  किंवा आयएमपीएसव्दारे  पैसे आपल्या खात्यातून जातात परंतु,ज्या व्यक्तीला पैसे देत आहोत त्याच्या खात्यात ते जमा होत नसल्याची अडचण सातत्याने दिसते.

तथापि, बँकांनी एक सीमा आखून दिली असून खासकरुन यूपीआय किंवा आयएमपीएसव्दारे ट्रान्झॅक्शन झाले नाही आणि संबंधित व्यक्तीच्या खात्यातून ते पैसे कापले गेले तर ही रक्कम काही दिवसांनंतर खातेधारकाच्या खात्यात पुन्हा जमा होते. परंतु, बँकेने सांगितलेल्या कालावधीत गेलेले पैसे परत जमा झाले नाही तर काय करायचे हा प्रश्न अनेकांना पडतो. या अनुषंगाने रिझर्व्ह बॅंकेने १९ सप्टेंबर २०१९ मध्ये एक सर्क्युलर जारी केले होते. यानुसार बँकेने दिलेल्या कालावधीत खातेदाराच्या खात्यावर पैसे जर जमा झाले नाही तर बॅंकेला प्रतिदिन १०० रुपयांप्रमाणे ग्राहकांना दंडाची रक्कम द्यावी लागेल.

प्रतिदिन १०० रुपयांप्रमाणे बॅंकेला ग्राहकांना परत करावे लागतात पैसे

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार,आयएमपीएस ट्रान्झॅक्शन फेल झाले तर टी १ दिवसात ग्राहकांच्या खात्यावर संबंधित रक्कम आपोआप जमा होणे आवश्यक आहे. यात टी चा अर्थ ट्रान्झॅक्शन झालेल्या दिवसापासून. याचा अर्थ असा की कोणतिही ट्रान्झॅक्शन फेल झाली तर पुढील कार्यालयीन कालावधीत ही रक्कम परत खात्यात झालीच पाहिजे. जर बॅंकेने असे केले नाही तर बॅंकेला दररोज १०० रुपयांप्रमाणे रक्कम ग्राहकांना द्यावी लागेल. यूपीआय संबंधित ट्रान्झॅक्शन मध्ये टी १ दिवसांत ग्राहकांच्या खात्यावर ऑटो रिर्व्हसल (Auto Reversal) होणं अपेक्षित आहे. जर असे झाले नाही तर टी १ दिवसांनंतर बॅंकेने ग्राहकाला १०० रुपये प्रतिदिन याप्रमाणे रक्कम देणं अनिवार्य आहे.

अशी करु शकता तक्रार

जर तुम्ही केलेले ट्रान्झॅक्शन फेल झाले तर हे प्रकरण सोडवण्यासाठी तुमच्या सेवा प्रदात्याने निश्चित केलेल्या अंतिम मुदतीपर्यंत थांबावे. जर बॅंकेने नियमानुसार दिलेल्या वेळेत तुमचे पैसे परत खात्यावर जमा केले नाहीत तर तुम्ही सेवा प्रदाता किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर तसेच सिस्टीम पार्टीसिपेंटकडे तक्रार करु शकता. जर त्यांनी एका महिन्याच्या आता तुमचा प्रश्न सोडवला नाही तर आरबीआयच्या अॅम्बेसिडरमनकडे तक्रार दाखल करु शकता. खाली दिलेल्या लिंकमध्ये तुमच्या शहरासाठी नियुक्त अॅम्बेसिडरमनबाबत माहिती मिळू शकते. 

तसेच तक्रारीसाठी ऑनलाईन लिंक देखील तुम्हाला या लिंकच्या माध्यमातून मिळू शकते. ही आहे लिंकhttp://rbidocs.rbi.org.in/Content/PDFs/AAOOSDT3102019 गतवर्षी कोरोना (Corona)संसर्गामुळे लॉकडाऊन (Lockdown) जारी करण्यात आले होते. तेव्हापासून ऑनलाइन ट्रान्झॅक्शनमध्ये (Online Transaction) वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या देशभरात कोरोनामुळे मागील वर्षी प्रमाणे स्थिती आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन जारी केल्यामुळे बॅंकांचे कामकाज मर्यादित वेळेतच सुरु राहत असल्याने नागरिकांकडे ऑनलाईन पेमेंट (Online Payment) हा एकमेव पर्याय आहे. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केल्यानंतर विशेषतः य़ूपीआय (UPI) किंवा आयएमपीएसव्दारे (IMPS) पैसे आपल्या खात्यातून जातात परंतु,ज्या व्यक्तीला पैसे देत आहोत त्याच्या खात्यात ते जमा होत नसल्याची अडचण सातत्याने दिसते.

तथापि, बँकांनी एक सीमा आखून दिली असून खासकरुन यूपीआय किंवा आयएमपीएसव्दारे ट्रान्झॅक्शन झाले नाही आणि संबंधित व्यक्तीच्या खात्यातून ते पैसे कापले गेले तर ही रक्कम काही दिवसांनंतर खातेधारकाच्या खात्यात पुन्हा जमा होते. परंतु, बँकेने सांगितलेल्या कालावधीत गेलेले पैसे परत जमा झाले नाही तर काय करायचे हा प्रश्न अनेकांना पडतो. या अनुषंगाने रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank)१९ सप्टेंबर २०१९मध्ये एक सर्क्युलर जारी केले होते. यानुसार बँकेने दिलेल्या कालावधीत खातेदाराच्या खात्यावर पैसे जर जमा झाले नाही तर बॅंकेला प्रतिदिन १०० रुपयांप्रमाणे ग्राहकांना दंडाची रक्कम द्यावी लागेल.

प्रतिदिन १०० रुपयांप्रमाणे बॅंकेला ग्राहकांना परत करावे लागतात पैसे

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार,आयएमपीएस ट्रान्झॅक्शन फेल झाले तर टी १ दिवसात ग्राहकांच्या खात्यावर संबंधित रक्कम आपोआप जमा होणे आवश्यक आहे. यात टी चा अर्थ ट्रान्झॅक्शन झालेल्या दिवसापासून. याचा अर्थ असा की कोणतिही ट्रान्झॅक्शन फेल झाली तर पुढील कार्यालयीन कालावधीत ही रक्कम परत खात्यात झालीच पाहिजे. जर बॅंकेने असे केले नाही तर बॅंकेला दररोज १०० रुपयांप्रमाणे रक्कम ग्राहकांना द्यावी लागेल. यूपीआय संबंधित ट्रान्झॅक्शन मध्ये टी1 दिवसांत ग्राहकांच्या खात्यावर ऑटो रिर्व्हसल (Auto Reversal) होणं अपेक्षित आहे. जर असे झाले नाही तर टी १ दिवसांनंतर बॅंकेने ग्राहकाला १०० रुपये प्रतिदिन याप्रमाणे रक्कम देणं अनिवार्य आहे.

अशी करु शकता तक्रार

जर तुम्ही केलेले ट्रान्झॅक्शन फेल झाले तर हे प्रकरण सोडवण्यासाठी तुमच्या सेवा प्रदात्याने निश्चित केलेल्या अंतिम मुदतीपर्यंत थांबावे. जर बॅंकेने नियमानुसार दिलेल्या वेळेत तुमचे पैसे परत खात्यावर जमा केले नाहीत तर तुम्ही सेवा प्रदाता किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर तसेच सिस्टीम पार्टीसिपेंटकडे तक्रार करु शकता. जर त्यांनी एका महिन्याच्या आता तुमचा प्रश्न सोडवला नाही तर आरबीआयच्या अॅम्बेसिडरमनकडे तक्रार दाखल करु शकता. खाली दिलेल्या लिंकमध्ये तुमच्या शहरासाठी नियुक्त अॅम्बेसिडरमनबाबत माहिती मिळू शकते. तसेच तक्रारीसाठी ऑनलाईन लिंक देखील तुम्हाला या लिंकच्या माध्यमातून मिळू शकते. ही आहे लिंकhttp://rbidocs.rbi.org.in/Content/PDFs/AAOOSDT3102019Post a Comment

0 Comments