वारकरी संस्था चालकाकडून ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार

 
आळंदी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका वारकरी संस्था चालकाने वारकरी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या ११ वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली आहे. आरोपीचे नाव शिवप्रसाद रामनाथ भोकनळ असे आहे. त्याच्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. यामुळे आता वारकरी शिक्षणाचे धडे शिकण्यासाठी घरदार सोडून येणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

 पीडित मुलाच्या घरी पाहुणे आल्याने त्याच्या आईने त्याला घरी आणले होते. त्यावेळी आरोपी शिवप्रसाद भोकनळ याने पीडित मुलाला तातडीने परत संस्थेत पाठवावे असे सांगितले. यावरून पीडित मुलगा संस्थेत जायचे नाही म्हणून रडायला लागला. यानंतर आईने मुलाला विश्वासात घेऊन विचारले असता त्याने त्याच्याबाबत घडलेला सगळा प्रकार सांगितला.

 सर्व विद्यार्थी हरिपाठाला गेल्यानंतर त्याच्यावर एका खोलीत अनैसर्गिक कृत्य करण्यात आले.तसेच शिवप्रसादने पीडित मुलाला याची वाच्यता केल्यास तुला बघून घेईल अशी धमकीदेखील दिली होती. याप्रकरणी आळंदी पोलिसात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.


 

Post a Comment

0 Comments