सध्या चलनातून दोन हजार रुपयांची नोट गायबच झाल्याचे दिसते. 'एटीएम'मधूनही दोन हजाराची नोट मिळत नाही. त्यामुळे ही नोट बंद झाली का, असा प्रश्न उपस्थित होत होता. आता त्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेच स्पष्टीकरण दिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये नोटाबंदी जाहीर केली. त्यानंतर काही दिवसांतच दोन हजारांची नोट बाजारात आली होती. मात्र, २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या नोटांच्या छपाईबाबत सरकारने कोणताही आदेश दिलेला नाही. याचा अर्थ या नोटांचे मुद्रण २०१९-२० पासूनच थांबले आहे. 'आरबीआय'च्या वार्षिक अहवालानुसार २०२०-२१ मध्ये दोन हजारांच्या नवीन नोटांचा पुरवठा झालेला नाही.
'एटीएम'मधून २००० रुपयांच्या नोटांच्या कॅसेट काढल्यामुळे या नोटा बंद होणार असल्याची चर्चा आहे. रिझर्व्ह बँकेने २६ मे रोजी २००० रुपयांच्या नोटांचा नवीन पुरवठा होणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. आता सरकारनेही या नोटा छापणार नसल्याचेही सांगितले आहे.
गेल्या दोन वर्षांत २००० च्या नोटा छापल्या गेलेल्या नाहीत. काळा पैसा पुन्हा एकदा वाढू नये, या उद्देशानंच सरकारने २००० रुपयांच्या नवीन नोटा न छापण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
0 Comments