कोरोनाकाळात टाळेबंदीमुळे अनेक कंपन्यांमधून कामगारांना काढण्यात आलं आहे. फक्त तरुण पिढीच नाही तर सर्व वयोगटातील लोक लाॅकडाऊनमुळे बेरोजगार झाले आहेत. अशातच मुलींना लाॅकडाऊनमध्ये नोकरी नसल्यामुळे मुली चक्क वेश्याव्यवसायाला लागल्या असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
संबंधित घटना ही उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील आहे. येथील सेक्टर १२२ परिसरातील एका दुकानात सोमवारी रात्री पोलिसांनी छापा मारला होता. यादरम्यान येथे संचालिका महिला आणि दोन तरुणींना ताब्यात घेण्यात आलं आहे. संबंधित ठिकाणी या तीन जणी अवैध्यरित्या वेशाव्यवसाय करत होत्या.
दरम्यान, संबंधित तिघींना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये आपल्या नोकऱ्या गेल्यामुळे काम नसल्याने त्या या मार्गाला लागल्या असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सांगण्यात आलेलं कारण खरं आहे की खोटं याचा पोलीस आता तपास करत आहेत. तसेच त्या आधी कुठे कामाला होत्या आणि काय काम करत होत्या याचा देखील तपास करण्यात येत आहे.
0 Comments