बार्शीत वार्तांकन करताना पोलिसांकडून पत्रकारास अरेरावीबार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहरातील बार्शी-तुळजापूर रोड वर अज्ञात व्यक्तीने फाशी घेऊन आत्महत्या केली होती. त्यासंदर्भात सबंधित व्यक्तीने बार्शी शहर पोलिस ठाण्यास कळविले असल्याने बार्शी शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी तेथे पोहोचले व त्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह त्याच्या मित्रास काढण्यास सांगितला होता. त्या मृत शरीरावर कोणत्याही प्रकरचे सॅनिटाईज करून घेतलेले नसताना तो मृतदेह त्याच्या मित्रास खाली काढण्यास सांगितला होता. 

त्याबाबत तेथे "झी २४" तास चे जिल्हा प्रतिनिधी अहमद शेख यांना कोणत्याही प्रकारची व्हिडिओ फुटेज घेऊ नका म्हणून धक्का मारून अरेरावी केलेली आहे. त्यासंबंधी शेख यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री संतोष गिरीगोसवी यांना फोन करून हकीकत सांगितली असता त्यांनी देखील शेख यांना अरेरावी केलेली आहे असे शेख यांनी सांगितले. या घटनेमुळे राज्यभरातील पत्रकारांनामध्ये असंतोष असून पोलिसांचा निषेध व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments