नात्याला काळीमा! ७ वर्षीय भाचीवर ३० मामाने केला अत्याचारठाणे:

ठाणे जिल्ह्यात ३० वर्षीय सख्या मामानेच ७ वर्षीय भाचीवर अत्याचार केल्याची संतापजनक  घटना समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून, पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास आरोपीला अटक केली आहे. विक्रम (३०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

दरम्यान मुलीला त्रास होऊ लागल्याने मुलीच्या आईने मुलीकडे चौकशी केली असता, मुलीने आईला झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने पीडितेला सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठत आरोपीची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून विविध कलमांतर्गत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. 

 पीडितेचा बापाने देखील लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. यामुळे टिळकनगर पोलिसांनी मुलीच्या वडिलांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घृणास्पद घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संपतापाची लाट पसरली असून, घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, आर. एन. कौराती हे करीत आहेत.

Post a Comment

1 Comments

  1. त्या मुलीच्या मामाच लग्न झालेलं नसेल त्यामुळे त्याने तसं केलं असेल

    ReplyDelete