बार्शीसह सोलापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊसबार्शी/प्रतिनिधी:

आधी कोरोनाचं संकट आता पाऊस यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. आज सलग दोन दिवसांपासून अवकाळी आपली धुवांधार बॅटिंग करत आहे. कमी जास्त प्रमाणात संपूर्ण जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.

आधीच लॉकडाऊन मुळे अडचणीत असलेला शेतकरी राजा ह्या अवकाळी पावसाच्या कचाट्यात सापडला आहे. पावसाने जनावराचा चारा नष्ट केलाय. भाजीपाल्याच्या शेतीलाही फटका बसला आहे. आंबा गळून पडत आहे, जनावरे विज पडल्यामुळे दगावत आहेत. आतातर मनुष्यहानीही झाली आहे. कोरोनामुळे शेतमालस उठाव नाही, त्यात हे आस्मानी संकट आले आहे.

काही महिन्यापूर्वी अतिवृष्टीमुळे याच भागात मोठे नुकसान केले होते. सतत नुकसानीचा सामना या भागातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे.

Post a Comment

0 Comments