"दुनिया गेली उडत म्हणत.... " म्हणत सुशांत सिंग राजपूतची पूर्व प्रेयसी लग्नाची घोषणा बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे  लवकरच विवाह करणार आहे. अंकिताने स्वतःच नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. सुशांत शी ब्रेकअप झाल्यानंतर काही वर्ष अंकिता हि सिंगल होती. तर आपण त्यानंतर मानसिक तणावातून गेल्याचं तिने सांगितलं होतं. 

२०१६ मध्ये दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले होते. तर तब्बल सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ते लग्नही करणार होते पण काही कारणाने ते विभक्त झाले होते. त्यावंतर अंकिता विकी जैन या व्यक्तिला डेट करू लागली. विकी हा एक उद्योजक आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तिने हा खुलासा  केला आहे. तिने सांगितलं की “प्रेम ही माझी गरज आहे. जसं जेवन ही गरज असते तसच प्रेम ही माझी गरज आहे.”

अंकिताने त्यांच्या नात्याविषयी आणखी काही गोष्टी सांगितल्या आहेत. ती म्हणाली, “मी कुठेही जाऊ, काम करू मला माझा पार्टनर माझ्या सोबत पाहिजे, बाकी दुनियेशी मला घेणदेणं नाही. आम्ही दोघे एकत्र बसून चहा जरी पित असू तरी ते माझ्यासाठी खूप आहे. माझ्या प्रियकरासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी मौल्यवान आहे.”

शेवटीची अंकिताने सुशांतचाही उल्लेख केला. ती म्हणाली, “सुशांत माझा फेवरेट स्टार आहे. पवित्र रिश्ता मध्ये आम्ही एकत्र काम केलं आहे. आणि तो माझा आवडता अभिनेता आहे.

Post a Comment

0 Comments