विनामास्क फिरणाऱ्या डॉक्टराचा मॉलमध्ये गोंधळ; डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल....



करोना काळात सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विना मास्क फिरण्याऱ्यांकडून दंडही वसूल केला जात आहे.
करोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मास्क घालणं सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचं हत्यार आहे.मात्र काही जणांच्या हलगर्जीपणाचा भुर्दंड इतरांना भरावा लागत आहे.

अनेक जण सर्रासपणे विनामास्क फिरताना दिसत आहेत.
असाच एक प्रकार कर्नाटकमधल्या मंगळुरुतील मॉलमध्ये घडला. एका डॉक्टरने मास्क घालण्यास विरोध करत मॉलमधील कर्मचाऱ्याशी वाद घातला. हा संपूर्ण प्रकार मॉलमधील सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डॉ, श्रीनिवास कक्किलाया हे खरेदीसाठी मॉलमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी मास्क घातला नव्हता. मॉलमधून वस्तू घेतल्यानंतर ते बिलिंग कॉउंटरवर आले. त्यावेळी कर्मचाऱ्याने त्यांना मास्क घालण्याची विनंती केली. मात्र डॉक्टर काही केल्या त्या कर्मचाऱ्याला दाद देईनात.

यावेळी कर्मचाऱ्याने सर्वांना नियम सारखे असल्याची जाणीव त्यांना करून दिली. मात्र तरीही त्यांनी आपला मस्तवालपणा कायम ठेवत मास्क घालणार नाही असं बजावलं. तसेच मला करोना होऊन गेल्याने माझ्यापासून कुणालाही धोका नसल्याचं सांगितलं.

शेवटी हा वाद पोलिसात गेला आणि मॉल कर्मचाऱ्याने विनामास्क फिरणाऱ्या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला. केंद्र सरकारने लसीकरणाविषयीच्या नियमावलीमध्ये केले महत्त्वपूर्ण बदल हा संपूर्ण प्रकार १८ मे रोजी घडला. डॉक्टरच्या हलगर्जीपणाचा व्हि.डि.ओ. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर डॉक्टरविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागलेली अाहे.

Post a Comment

0 Comments