शिवसेना नगरसेवकाची दादागिरी; तरुणाला बेल्ट, लोखंडी रॉडने बेदम मारहाण


उल्हासनगर महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकाची दादागिरी पाहायला मिळाली आहे. या नगरसेवकाने आपल्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने एका तरुणाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तरुणाच्या संपूर्ण शरीरावर काळे निळे डाग पडले आहेत. 

 जुन्या भांडणाचा राग मनात धरून या तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर नगरसेवक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, जुना अंबरनाथ गाव परिसरातील धर्माजी पाटील कॉलनी भागात रवी जयसिंघानी हा तरुण राहतो. 

रात्री सव्वा बाराच्या सुमारास रवी आपल्या घराबाहेर एकटा फिरत होता. याच वेळी शिवसेना नगरसेवक आकाश पाटील आपले दोन साथीदार यश आणि मनीष यांच्या सह तिथे आला. नगरसेवक आकाशने रवीला 'तू बाहेर का फिरतो आहेस' असे बोलून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, त्यानंतर त्याने आपल्या कमरेला असलेला बेल्ट काढून रवीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

 आकाशाच्या सोबत असलेल्या यश पाटील आणि मनीष यांनी देखील रवीला मारहाण करण्यास सुरुवात केली. या दोघांनी लोखंडी रॉडने रवी चा पाठीवर छातीवर पोटावर पायावर मारहाण करण्यात सुरुवात केली. या मारहाणीत रवीचा संपूर्ण शरीरावर काळे निळे डाग पडले असून त्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सोडण्यात आले.

 रवीला मारहाण झाल्यानंतर त्याच्या शरीरावर जे काय निळे डाग पडले होते, त्यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. तसंच या व्हिडीओमध्ये आपल्याला कोणी कोणी मारहाण केली आणि आपल्याला न्याय मिळावा यासंबंधीची रवी याचना करताना दिसतो आहे.

या प्रकरणाची रवीने अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यानंतर पोलिसांनी शिवसेना (political party) नगरसेवक आकाश पाटील, यश पाटील आणि मनीष विरोधात भारतीय दंड संहितेच्या ३२४,५०४,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अजूनही कोणाला अटक केलेले नाही.

Post a Comment

0 Comments