"चंद्रकांतदादा पाटलांची माया कुठे आहे, मला माहित आहे" - मंत्री हसन मुश्रीफ


हसन मुश्रीफ यांनी माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हरलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील, असे पाटील म्हणाले होते. त्यावरुन हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मला विकावे लागेल असे म्हणत असतील तर , त्यांची माया कुठे आहे हे मला माहिती आहे,'' असा इशारा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. 

मुश्रीफ म्हणाले, ''पाटील यांच्यावर तीन अब्रूनुकसानीचे दावे दाखल केले आहेत.यावेळी ते म्हणाले की ''केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपच्या नेत्यांचे कान टोचले आहेत. भाजपचे नेते सहकार्य करण्याऐवजी आडमुठी भूमिका घेतात. मी पुन्हा येईन म्हणून काही होणार नाही, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.

माझ्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आणि मी हारलो तर त्यांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील. मुश्रीफ यांनी माझ्यावर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा. मी त्या दाव्यांना घाबरत नाही. पाटील म्हणाले, माझी सर्व प्रॉपर्टी विकली, तर १०० कोटी काय १ कोटीही मिळणार नाही. त्यामुळे दाखल केलेला खटला मुश्रीफ यांनी जिंकला तर त्यांना मलाच विकावे लागेल'',

Post a Comment

0 Comments