शरद पवार आणि ठाकरे पितापुत्रांचे फेसबुकवर बदनामी ; बारामतीत दोघांच्या विरुद्ध बारामतीत गुन्हा दाखल


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल फेसबुकवर बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याचा दोघांवर आरोप आहे.

केशव कुंथलगिरीकर आणि भानू बोराडे या दोन फेसबुक अकाऊण्ट धारकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केशव कुंथलगिरीकर यांनी आदित्य ठाकरे यांचा फोटो मॉर्फ करुन त्यांची बदनामी करणारा मजकूर लिहिला होता. 

तर भानू बोराडे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो मॉर्फ करुन मानहानीकारक पोस्ट लिहिल्याचा आरोप आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात नितीन यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments