बार्शी/प्रतिनिधी:
संपूर्ण जगामध्ये कोरोना या आजाराने थैमान घातले असून या आजारामध्ये अनेक लोक मृत्यूमुखी पडले तसेच कोरोणातून बरे झाल्यानंतर अनेक पेशंटना म्युकरमायसोसिस या आजारामुळे अंपगत्व आले.
या आजारावर इम्युनिटी बूस्टर हा काढा प्रभावी ठरत असल्याने अनेकांना याचा फायदा होताना दिसत आहे. या काढयामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढून कोरोना सारख्या आजाराला माणूस सहज हरवून लावत असल्याने आगळगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने २५० लिटर इम्युनिटी बूस्टर काढयाचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच सूरज आगळे, पत्रकार सागर गरड, दशरथ गरड, लक्ष्मण आगळे, बबन गायकवाड, आनंद कोरे, नागनाथ आगळे, सतीश गिराम, अमोल विधाते, अनिल राजमाने, शिवलिंग जमदाडे उपस्थित होते
0 Comments