माळशिरस/प्रतिनिधी:
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अवैधरित्या चालू असणाऱ्या हातभट्टी अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या वेळापूर पोलीस पथकावर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्राणघातक हल्ल्यात वेळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे व कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके एक गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत. हा प्राणघातक हल्ला २० ते २५ जनाजा जमावाने केला आहे.. यामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
कारवाईसाठी गेलेल्या पोलीस पथकावर हल्ला
पुणे पंढरपूर महामार्गावर वेळापूर येथे पालखी चौक परिसरात पारधी समाजाची वस्ती आहे. त्या वस्तीवर अवैधरित्या हातभट्टी दारूची विक्री करण्यात येत होती. ही अवैधरित्या हातभट्टी गेल्या अनेक दिवसापासून चालू होती. या हातभट्टीवर अद्यापही कोणत्याही पोलिस पथकाने कारवाई केली नव्हती. मात्र या ठिकाणी अवैधरित हातभट्टी दारू निर्माण करून विकली जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक भगवान खरतडे व अन्य दोन पोलीस कॉन्स्टेबल सोबत कट्टी अड्ड्यावर चौकशी करत असताना पारधी वस्तीवरील २० ते २५ महिला व पुरुषांच्या टोळक्याने थेट पोलिस पथकावर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये पोलिसांनी प्रतिकार करण्याची काही प्रयत्न केला. मात्र जमावाचा आक्रमकपणा पाहत पोलिसांच्या आवाक्याबाहेर होत गेले. या गदारोळात दोन पोलीस गंभीर जखमी झाले. तर एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.
पोलीस निरीक्षकासह दोन पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू
प्राणघातक हल्ल्यानंतर पोलीस निरीक्षक भगवान घोरपडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुकी हे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना वेळापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. पोलीस नाईक महेरकर यांना किरकोळ दुखापत झाली.
अद्यापही पोलिसांकडून कोणतीही कारवाई नाही
वेळापूर पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला झाल्यामुळे सोलापूर पोलीस खात्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सदर हल्ला करणाऱ्या जमावा विरोधात अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र लवकरच ग्रामीण पोलिसांकडून याबाबत कारवाई केली जाणार आहे. पोलीस निरीक्षक वर हल्ला झाल्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बनले आहे.
0 Comments